हर घर तिरंगा झेंडा उपक्रमाच्या अनुषंगाने जनता विद्यालय येडशी येथून बँड पथकासह विद्यार्थी रॅली

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

*भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत हर घर झेंडा घरोघरी तिरंगा उपक्रमाच्या अनुषंगाने जनता विद्यालय येडशी येथून बँड पथकासह विद्यार्थी रॅली काढण्यात आली*
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत .या गौरवशाली पर्वा निमित्त 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत आजादी का अमृतमहोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यासाठी जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्यांचे संस्मरण व्हावे या उद्देशाने जनता विद्यालय येडशी येथून बॅण्ड पथकासह विद्यार्थी रॅलीचे शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले .

या रॅलीमध्ये इयत्ता पाचवी ते आठवी चे 529 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या या रॅलीमध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गाढवे सर यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवली या रॅलीमध्ये विद्यालयाचे क्रीडा प्रमुख श्री रेवडकर दयानंद, श्री गायकवाड सर, श्री लटके सर ,श्री घेडे सर, श्री गुंजाळ सर, श्री निळ सर,श्री.खुने सर, श्रीमती माने मॅडम श्रीमती इंगळे मॅडम ,श्रीमती भोजने मॅडम, हे या रॅलीमध्ये सहभागी झाले होते

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!