www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898
शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून, मदत करण्याच्या आमदार राजाभाऊ राऊत यांच्या सूचना.
बार्शी शहर व तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तालुक्यातील जून-जुलै महिन्यातील पावसाची सरासरी ही २३१ मिलिमीटर असून, आत्तापर्यंत ३८२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

२ ऑगस्ट रोजी बार्शी मंडलात ८३.५ मिलिमीटर पावसाची व खांडवी मंडलात ६७ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. सातत्याने पडणारा पाऊस व जादाच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे, त्याचप्रमाणे उगवून आलेले पिके पिवळी पडत असून पिकांचे नुकसान होऊ लागले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आमदार राजाभाऊ राऊत यांनी तहसील कार्यालय बार्शी येथे मा.तहसीलदार सुनील शेरखाने, तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम, नायब तहसीलदार संजीवन मुंडे, मंडल अधिकारी, तलाठी कृषी सहाय्यक यांच्यासोबत तातडीची आढावा बैठक घेतली.
सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून मंडल अधिकारी, तलाठी व कृषी सहाय्यकांनी पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशा सूचना आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिल्या.

या बैठकीत तालुक्यातील सध्याच्या प्राप्त परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेण्यात आला आहे. पुढील आठवड्यात आमदार राजाभाऊ राऊत हे मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना या बैठकीतील संपूर्ण माहिती देऊन तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची मागणी करणार आहेत.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.