www.starmazanews.com ठाणे जिल्हा प्रतिनिधी चंदन ठाकुर
मीरा रोड : मिरा रोड भागात राहणाऱ्या इयत्ता 8 च्या वर्गात शिकत असलेल्या एका 13 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्यानंतर 35 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघा आरोपीना काशिमिरा पोलिसांनी अटक केली. शांतीपार्क जवळील क्लास्टर 1 मध्ये राहणाऱ्या हिना सिंग वय( 27 ) या उदरनिर्वाह साठी बोरीवलीच्या एका बारमध्ये गायिका म्हणून काम करतात. त्यांची 2 मुले, भाऊ, त्याचे कुटुंब, बहीण आणि तिचा मुलगा असे एकत्र राहतात. त्यांचा 8 वीच्या वर्गात शिकणारा 13 वर्षाचा मुलगा मयांक विष्णू ठाकूर हा इमारतीखाली सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ त्याच्या मामाने आई हिनाला 30 जुलै रोजी दाखवला. त्यावरून आई व मामाने मयंकला खूप समजावून सांगितले . पुन्हा असे केल्यास मारेन आणि घराबाहेर जाऊ देणार नाही, असा सज्जड दम दिला. त्या नंतर 31 जुलैच्या रात्रीपासून मयांक अचानक बेपत्ता झाल्याने 1 ऑगस्ट रोजी सकाळी त्याचे अनोळखी व्यक्तीने अपहरण झालेचे खंडणीचा फोन आल्यानंतर लक्षात आले हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांसह तपास सुरू केला. पोलिसांनी शांती पार्कच्या रॉयल पॅलेस इमारतीत राहणारा अफजल अन्सारी ,वय ( 22 ) व नयानगर भागात राहणार इमरान शेख, वय ( 24 ) यांना ताब्यात घेतले. त्यांनी मयांकच्या अपहरण व हत्येची कबुली दिली, 31 जुलैला रात्री त्यांनी मयांकला वाहनाने वसई महामार्गावरील कामण खाडी पुलाजवळ नेले. तेथे त्यांने घरी जायचे असल्याचे सांगताच दोघांनी त्याच्या पोटात चाकू खूपसून निर्घन पणे हत्या केली. त्याचा मृतदेह त्यांनी कामण खाडी पुलाच्या खाली टाकला.पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपींना अटक केली.
www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.