गुणवत्तेची कदर करणारी माणस ज्या मातीमध्ये असतात त्या मातीत माणिक मोत्यासारखी माणसं जन्मास येतात- प्राचार्य डॉ यशवंत पाटणे

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.comपरंडा प्रतिनिधी गोरख देशमाने


परंडा दि. 1 ऑगस्ट 2022 गुणवत्तेची कदर करणारी माणसं ज्या मातीमध्ये असतात त्या मातीत माणिक मोत्यासारखी माणस जन्मास येतात असे प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ दीपा सावळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यामध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सातारा येथील प्राचार्य डॉ यशवंत पाटणे यांनी केले.


येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ दीपा सावळे या 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर अध्यक्ष सुनील नाना शिंदे व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी या सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा या संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ अशोक मोहेकर तर कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून सातारा येथील प्राचार्य डॉ यशवंत पाटणे उपस्थित होते. या सेवानिवृत्ती सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ मंडळाचे जयकुमार शितोळे, धुळे येथील प्राचार्य डॉ चंद्रकांत मोरे, बलभीम महाविद्यालय बीड येथील प्राचार्य डॉ व्ही जी सानप, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद येथील प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख ,सोलापूर येथील ज्येष्ठ विचारवंत प्रा ए डी जाधव, बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव येथील प्रा डॉ जयेंद्र लेकुरवाळे, सौ शितल लेकुरवाळे, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद चे संचालक डॉ डी के गायकवाड, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ परांडा या संस्थेच्या सचिव अशा मोरजकर, ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब चे प्राचार्य डॉ सुनील पवार, शिवाजी महाविद्यालय बार्शी येथील प्रा डॉ आर आर कोठावळे, सोलापूर विद्यापीठाचे माजी दिन प्रा नामदेव गरड, प्रा डॉ विकास कदम, सोलापूर येथील डॉ हिरेमठ, डॉ शीला स्वामी ,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ विलास खंदारे, आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .

तसेच महाविद्यालयास नेक चा ए ग्रेड मिळाल्यामुळे मान्यवरांच्या हस्ते डॉ विद्याधर नलवडे ,डॉ सचिन चव्हाण ,डॉ महेशकुमार माने, डॉ अक्षय घुमरे, डॉ संतोष काळे, डॉ प्रशांत गायकवाड ,प्रा दीपक तोडकरी यांचा सत्कार करण्यात आला .तर शिक्षकेतर कर्मचारी कार्यालय अधीक्षक भाऊसाहेब दिवाने बाबासाहेब शिरसागर यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले .यावेळी प्राचार्य डॉ दीपा सावळे लिखित स्मृतीच्या झुरख्यातून शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय – विकासाची वाटचाल ,माझा जीवन प्रवास, उस्मानाबाद जिल्ह्यातील धार्मिक स्थळे व देव देवता या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ सीला स्वामी, प्रा दत्तात्रय मांगले, प्रा विजय जाधव, प्रा डॉ जयेंद्र लेकुरवाळे, प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख, प्राचार्य डॉ व्ही. सानप प्रा जाधव, प्राचार्य डॉ चंद्रकांत मोरे, यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी या महाविद्यालयाचे नवनिर्वाचित प्राचार्य डॉ सुनील जाधव यांचा सत्कार करण्यात आला .प्रा डॉ शहाजी चंदनशिवे, प्रा डॉ शीला स्वामी व डॉ महेश माने यांनी यांनी प्राचार्य डॉक्टर दीपा साबळे यांच्या जीवनावर आधारित तयार केलेल्या यशोदीप गौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ दीपा सावळे व त्यांचे पती दिनेश सावळे या दोघांचा संस्थेच्या वतीने भव्य दिव्य सन्मान सोहळा आयोजित करून सत्कार करण्यात आला .या सत्कारास उत्तर देताना प्राचार्य डॉ दीपा सावळे यांनी आपला जीवन प्रवास आणि 35 वर्षाच्या सेवेचा अनुभव व संस्थेची साथ कशी मिळाली व या महाविद्यालयास नेक चा अ दर्जा कसा प्राप्त झाला याचा सर्व वृत्तांत आपल्या मनोग तामध्ये व्यक्त केला. संस्था सचिव संजय निंबाळकर यांनी या महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये प्राचार्य
डॉ दिपा सावळे यांचा मोलाचा वाटा असून त्यांनी महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन महाविद्यालयाची ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेली असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी परंडा शहरातील व उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक मान्यवर माजी विद्यार्थी ,पत्रकार, शैक्षणिक व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक पदाधिकारी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते . तू कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार डॉ महेश माने यांनी मानले.

www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!