स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परांडा दि. 30 जुलै 2022 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जपत वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक कै. डॉ किशोर काळे यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या मातोश्री शांताबाई काळे यांच्यावर वाईट परिस्थिती ओढवली आहे .त्या अनेक वर्षापासून हाल अपेष्टा सहन करीत जगत आहेत .त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन साठी त्या पुण्याला गेल्यानंतर त्यांची घरातील सर्व वस्तूंची चोरी झाली त्यामुळे त्यांच्यावर वाईट प्रसंग आला. याची जाणीव ठेवून महाविद्यालयाने त्यांना आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ दीपा सावळे यांच्या पुढाकाराने महाविद्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी जमेल त्या पद्धतीने वर्गणी जमा करून सहा हजार एकशे दहा रुपये त्यांना दिले .यावेळी डॉ किशोर काळे यांच्या आई शांताबाई काळे यांनी महाविद्यालयाचे मनःपूर्वक आभार मानले व सर्वांना आशीर्वाद दिले .यावेळी प्राचार्य डॉ दीपा सावळे या सेवानिवृत्त झाल्यामुळे यानंतरही आर्थिक अडचण भासल्यास महाविद्यालयास संपर्क करावा असे त्यांना सांगण्यात आले. महाविद्यालयातील आई क्यू ए सी चेअरमन डॉ महेशकुमार माने, डॉ शहाजी चंदनशिवे, प्रा विजय जाधव यावेळी उपस्थित होते. प्राचार्य डॉ दीपा सावळे यांच्या सह डॉ अतुल हुंबे , डॉ विद्याधर नलवडे, डॉ अक्षय घुमरे, प्रा अमर गोरे पाटील, प्रा दीपक तोडकरी, डॉ महेश कुमार माने, डॉ शहाजी चंदनशिवे, प्रा जोतिबा शिंदे, प्रा दत्ता मांगले, प्रा उत्तम कोकाटे, प्रा संभाजी धनवे, प्रा आनंत अनुभुले, प्रा विजय जाधव, शिक्षकेतर कर्मचारी जयंत देशमुख आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही आर्थिक योगदान देऊन महाविद्यालयाची परंपरा आणि सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यामुळे महाविद्यालयाचे इतरत्र कौतुक होत आहे.
स्टार माझा न्यूज:- संपादक –रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.