बार्शी शहरातील प्रथम ISO मानांकनाचे स्वस्त धान्य दुकान संलग्न CSC काँमन सर्व्हिस सेंटर चे उदघाटन.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898 / 9408749898

बार्शी प्रतिनिधी दिनांक 28 जुलै 2022 गुरुवार रोजी बार्शी मधील तालुक्यातील पहिलेच स्वस्त धान्य दुकान संलग्न कॉमन सर्विस सेंटर चे मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले.दुकान नं २०१ परांडा रोड,गांधी स्टाँप बार्शी. CSC सेंटर चालक सौ.चंद्रकला बोरगावकर यांनी सांगितले की या सेंटर मध्ये पुढील प्रमाणे सुविधा मिळणार आहेत. यामध्ये 7/12 उतारा/ विमा भरणे/ आधार कार्ड नवीन व दुरुस्ती/ कलर झेरॉक्स /लाईट बिल भरणे/ मोबाईल रिचार्ज/ डिश टिव्ही रिचार्ज /पॅन कार्ड/ नवीन रेशन कार्ड फॉर्म भरणे/ पैसे काढणे/ पैसे भरणे /रेशन कार्ड ऑनलाइन करणे /नाव कमी करणे इत्यादी सुविधा या सेंटरमध्ये मिळणार आहेत महाराष्ट्र शासनाने नवीन योजना चालू केली आहे. या योजनेचा खूप लोकांना फायदा होणार आहे. या सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार असल्यामुळे नागरिकांना इतरत्र जाण्यासाठी किंवा दुकान शोधण्याची आवश्यकता पडणार नाही. या कार्यक्रमासाठी बार्शीचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
मा.तहसिलदार श्री.शेरखाने साहेब श्री. निवृत्ती लांडगे साहेब पुरवठा अव्वल कारकुन व,,श्री. ऋषिकेश धनवडे साहेब गोदाम व्यवस्थापक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी श्री.मुंढे साहेब
नायब तहसिलदार ,श्री.काझी साहेब पुरवठा नायब तहसिलदार, श्री. जोशी साहेब पुरवठा निरिक्षक, ऑपरेटर रूपाली जाधव रास्त भाव दुकानदार तालुकाध्यक्ष श्री मारुती अंधारे,शहराध्यक्ष योगेश चौधरी साहेब , संपर्क प्रमुख अक्षय चव्हाण साहेब, सचिव राजेंद्र सुरवसे तसेच इतर पदाधिकारी तसेच ह .भ. प धोंडीराम महाराज दत्त मठ बा, सुनील पल्ले ऑडिटर, सायारा मुल्ला मॅडम व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार सौ.चंद्रकला बोरगावकर यांनी मानले.




starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!