स्टार माझा न्यूज:- ठाणे जिल्हा प्रतिनिधी चंदन ठाकूर
भाईंदर : मीरा रोड नयानगर परिसरातील एका मालमत्तेचे बनावट दस्तावेज बनवून ती जागा हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात चौघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणा मध्ये वकिलाचाही सामील आहे. आरोपींना न्यायालयाने 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मीरा-भाईंदर शहरात गेल्या काही वर्षांपासून बनावट कागदपत्र बनवून मालमत्ता हडप करण्याचे अनेक प्रकार वाढले आहेत. 2017 मध्ये सबिना कुरेशी या हज यात्रेला गेल्या असताना. त्यांचे हज यात्रेमध्ये सौदी अरेबिया येथे निधन झाले. सबिना या हज यात्रेला जाण्यापूर्वी त्यांनी त्यांचे भाऊ अमुलभाई पटेल यांच्याकडे घराची देखरेख करण्यासाठी चावी दिली होती. त्यानंतर पटेल यांनी निधन होण्याच्या काही महिन्यापूर्वीचे व्हिल पेपर बनवून त्यावर सबिना यांची बोगस सही, अंगठा मारून नोटीस कागदपत्र बनवल्याची तक्रार सबिना यांची मुलगी रोशनी यांनी नयानगर पोलीस ठाण्यात केली आहे.
स्टार माझा न्यूज:- संपादक– रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.