लायन्स क्लब बार्शी व लायन्स क्लब बार्शी चेतना च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक:-रियाज पठाण 9405749898/9408749898

माजी इंटरनॅशनल डायरेक्टर
तथा लायन्स इंटरनॅशनल फाऊंडेशन चे विद्यमान सदस्य.. एम जे एफ ला.अरुणाजी ओसवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला

लायन्स क्लब बार्शी व लायन्स क्लब बार्शी चेतनाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न झाला लायन्स क्लब बार्शीच्या अध्यक्ष म्हणून ला. संदीप नागणे तसेच लायन्स क्लब बार्शी चेतनाच्या अध्यक्षा म्हणून ला.गायत्री बंडेवार यांनी पदभार स्वीकारला
या समारंभासाठी नूतन पदाधिकाऱ्यांना पदग्रहण अधिकारी म्हणून लाइन्सच्या इंटरनॅशनल डायरेक्टर अरुणा ओसवाल यांची उपस्थिती होती तर नवीन सभासदांना शपथ प्रधान अधिकारी म्हणून माजी प्रांतपाल जगदीशजी पुरोहित उपस्थित होते लायन्स क्लबचे मावळते अध्यक्ष ॲड विकास जाधव यांच्या अध्यक्षते खाली पार पडलेल्या समारंभाच्या व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी मंत्री दिलीप सोपल प्रथम प्रांतपाल भोजराज नाईक निंबाळकर माजी प्रांतपाल जितेंद्र माढेकर नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी रीजन चेअरमन बापूसाहेब कदम झोन चेअरमन गणेश भंडारी यांची प्रमुख उपस्थिती होती
लायन्स क्लब बार्शी चे नूतन पदाधिकारी
अध्यक्ष संदीप नागणे
सेक्रेटरी उमेश काळे
खजिनदार बालकिशन जाजू संचालक मंडळातील विविध पदावर
अक्षय बंडेवार ॲड विकास जाधव
बापूसाहेब कदम सुभाष भोसले प्रशांत पंडित सुरेश राऊत भगवंत पोळ ओंकार शहाणे गिरीश शेटे रवींद्र कसपटे नंदकुमार कल्याणी दिनेश श्रीश्रीमाळ लखन राजपूत जयप्रकाश भराडीया गोवर्धन जाजू गोविंद तापडिया केशवराज मुळे राहुल साखरे अतुल कुंभारे नितीन कौलवार यांचा समावेश केलेला आहे
लायन्स क्लब बार्शी चेतनाच्या पदाधिकारी
अध्यक्ष गायत्री बंडेवार
सचिव पूनम लड्डा
खजिनदार वर्षा साखरे
संचालक मंडळातील विविध पदावर
जयश्री कदम अश्विनी जाधव विद्या नागणे प्रियंका माढेकर तेजस्वी गपाट रिता बागमार नीता देव वृषाली होनराव श्रद्धा लड्डा पूजा गोधने अरुणा कल्याणी उमा भोसले अमृता कसपटे अस्मिता चौधरी वंदना देवणे यांचा समावेश होता तसेच प्रणाली गांधी, रेश्मा चाटी माया कौलवार प्रियंका येडलवार श्रद्धा कोत्तावार मधुरा पाटील दिपा भादुले या नविन सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
लायन्स क्लब बार्शी हा क्लब मागील वर्षात संपूर्ण प्रांतात उत्कृष्ट कार्य करण्यात एक नंबर आहे याही वर्षी असेच कार्य केले जाईल असे आश्वासन नूतन अध्यक्ष नागणे यांनी दिले
लायन्स क्लब चेतना नवीन क्लब असला तरी महिला सक्षमीकरण व निराधार यांना आधार देण्यासाठी या वर्षात समाजामुख कार्य करेल असे चेतनाच्या अध्यक्षा गायत्री बंडेवार यांनी मनोगतात सांगितले
लायन्स क्लब बार्शी मेन चा मागील वर्षाचा अहवाल मावळते अध्यक्ष ॲड विकास जाधव यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगत सांगितला तसेच लायन्स क्लब बार्शी चेतनाचा अहवाल पूनम लड्डा यांनी वाचला
दोन्ही क्लबचे कार्य हे लायन्स इंटरनॅशनल ला अभिप्रेत असलेल्या उद्देशांना अनुसरून असून खऱ्या अर्थाने समाजातील उपेक्षित गरजू लोकांपर्यंत योग्य ती मदत आणी सेवा पोहचण्यात यशस्वी झाले आहेत असे गौरवोद्गार अरुणाजी ओसवाल यांनी काढले. गरजू लोकांसाठी दानशूर व्यक्तींनी हात पुढे केले पाहिजेत असेही आपल्या मनोगत सांगितले
यावेळी जगदीश पुरोहित माजी मंत्री दिलीप सोपल नगराध्यक्ष अशोक तांबोळी जितेंद्र दोशी बापूसाहेब कदम गणेश भंडारी यांनीही नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. या पदग्रहण सोहळ्याचे औचित्य साधून लायन अरुणाजी यांच्या हस्ते दोन्ही क्लब कडून कर्मवीर थाळी येथे एक क्विंटल धान्य व गोरक्षण येथे ट्रक भरून चारा प्रदान करण्यात आला.

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अक्षय बंडेवार यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड विकास जाधव यांनी केले सूत्रसंचालन नीता देव यांनी केले तर आभार प्रदर्शन नूतन सचिव उमेश काळे यांनी केले

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!