starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा, ता.२३ ( प्रतिनिधी ) संगीत गायनाची अंतर्मनात ओढ असली की प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन आवाजातील सुराच्या सरावातील सातत्याने यशाला गवसणी घालता येते” याचाच प्रत्यय परंडा तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील आलेश्वर ता.परंडा येथील ऊदोन्मुख गायक सोहील सादिक मुलाणी याच्या जिद्दीकडे पाहुन आला आहे.सध्या मराठी कलर्स वाहिनीवरुन प्रसारित होत असलेल्या ” सुर नवा, ध्यास नवा” या कार्यक्रमासाठी सोहीलची निवड झाली आहे. या यशाबद्दल ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .
“संगीत हे मनाला रिझवणारे औषधच आहे”असं मानलं जातं.अलेश्वर ता.परंडा येथील एका सामान्य कुंटुबातील उदोन्मुख गायक सोहील मुलाणी यास लहान पणापासुन गीत संगीताचा छंद जडला. त्याने प्रतिकुल परिस्थितीचा संघर्ष करीत गीत गायनाची आवड जोपासली.सोहेल हा स्वरबध्द आवाजातुन श्रोत्यांच्या ह्रदयाची तार छेडल्याशिवाय राहात नाही.विविध वाद्याच्या तालावर हिंदी,मराठी चिञपटातील गाणी ,लोकगीते गाऊन प्रेक्षक श्रोत्यांचे मनोरंजन करीत असे.
अलेश्वर गावातील स्वर संगम बॕन्जो बॕण्डपथकात गायक म्हणुन काम करीत होता.लग्नसराई,विविध कार्यक्रमात गावोगावी जावुन गायाकीच्या पैशातुन कुंटुबाला हातभार लावत होता. सुमधुर आवाजात माईकवरुन गाणे गाऊन ऐकणा-या श्रोत्यांची मने जिकांयचा त्यातुन उस्फुर्त बक्षिस मिळवायचा.गाताना गाण्याचे गीतकार,संगीतकार,गायक यांची नावे सांगायला विसरत नव्हता.बॕण्डपथकात गाताना प्रेक्षकांची दाद मिळायची.सोहेलने गाण्याच्या सवयीने संगीत आपलेसे केले.गीतगायनाची आराधना करणाऱ्या सोहीलला सध्या मराठी कलर्स वाहिनीवरील “स्वर नवा,ध्यास नवा” या कार्यक्रमात गाण्याची संधी मिळाली आहे.सध्या सर्वञ सोशल मिडीयावर कार्यक्रमातील आॕडीओ क्लिप गाजत आहे.या कार्यक्रमाचे परिक्षक सुप्रसिध्द कलाकार अवधुत गुप्ते यांनी सोहीलच्या गायकीची मोठी प्रशंसा केली आहे.उदोन्मुख गायक सोहेल मुलाणी यास गीतगायनासाठी चंदन कांबळे यांनी प्रोत्साहन देवुन मार्गदर्शन केले आहे. सोहेलचे शिक्षण गायन विशारद एम. ए. म्युजिक(करमाळा) येथे सुरु आहे. रविवार ता.२४ जुलै रोजी कलर्स वाहिनीवरील कार्यक्रमात सांयकाळी ७ वाजता सोहेल मुलानी गाताना प्रेक्षकांच्या भेटीस दिसणार आहे.चिकाटी अन् जिद्दीच्या बळावर सोहेलने यश संपादन केल्याने सर्वञ अभिनंदन होत आहे.
starmazanews.com संपादक :-रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.