www.starmazanews.com परांडा प्रतिनिधि गोरख देशमाने
पेशवा युवा मंच यांच्यावतिने आज दिनांक 3/5/2022 वार मंगळवार रोजी श्री.परशुराम जयंती हंसराज स्वामी मठ परंडा येथे साजरी करण्यात आली. तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी नुतन कार्यकारनी जाहीर करण्यात आलेल्या पदाधीकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक श्री. मकरंद जोशी हे होते. तर प्रमुख पाहुणे ब्राम्हण समाजाचे जेष्ट नागरिक श्री. पुरूषोतम ( तात्या ) वैदय, श्री. प्रकाश पाटील सर, श्री.नितीन माढेकर हे होते. प्रथम श्री.परशुरामाच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैदयकिय शिक्षण येथे घेत असलेले कु. शुभम सतिश कुलकर्णी मुंबई येथे याचा विशेष सत्कार पेशवा युवा मंच यांच्या वतिने करण्यात आला.नुतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना समाजाला अग्रेसर ठेवायचे असेल तर आपण आपले कर्तव्य आणी कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी समाजातील मुलांनी ज्ञान मिळवणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन अॅड श्री. सुनिल काळे यांनी व्यक्त केले. तसेच स्पर्धा परिक्षेत मुलांनी सिद्धता दाखवुन यश प्राप्त करावे असे प्रतिपादन श्री. शाम कुलकर्णी यांनी व्यक्त केले. नुतन कार्यकारिणी पेशवा युवा मंच तालुका अध्यक्ष श्री समीर संजय पुजारी, उपाध्यक्ष अमोल श्रीकृष्ण वांबुरकर, सरचिटणीस श्री.रोहीत रमेश मुगळीकर,सचिव श्री.महेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष श्री.प्रसाद पुरूषोत्तम वैद्य.
शहर पदाधीकारी अध्यक्ष श्री. अमित अनंत जोशी, उपअध्यक्ष श्री.गौरव अजित पाटील, सचिव रोहीत निशिकांत भोत्रेकर. सहसचिव श्री.किरण रमेश वैद्य.
पेशवा युवा मंच महिला अध्यक्षपदी सौ. अर्चना भोत्रेकर, उपअध्यक्ष सौ. स्नेहल पत्की, सचिवपदी सौ अंजली भालेराव,सहसचिव सौ.अश्विनी बाळासाहेब देशमुख. निधी संकलक सौ.स्वाती सुभाष शेळगावकर.
पेशवा पुरोहीत मंच अध्यक्षपदी राजीव कुलकर्णी, उपाध्यक्ष. श्री. प्रकाश कुलकर्णी, सरचिटणीस श्री.गणेश पारेवाडीकर, सचिवपदी रवि रमेश वैदय. यांची निवड करण्यात आली. यावेळी कार्यक्रमास उपस्थित अजित पाटील,श्रीराम विव्दत,नितीन भोत्रेकर, आनंदखर्डेकर, सतिश कुलकर्णी,देविदास देशमुख, महेश कुलकर्णी,श्रीकांत भालेराव,सुनिल काळे,शाम कुलकर्णी,जयंत भातलवंडे,अनंत केसकर,बाळासाहेब जकातदार,बाळासाहेब देशमुख,हरीष जामकर,हरिभाऊ जोशी,कल्यान घोगले,देशमुख, शुभम भांतलवंडे, किरण वैदय, नागेश वैद्य, जयेश विव्दत व सर्व पेशवा युवा मंच चे पदाधीकारी ब्रह्मवृंद माहिला उपस्थित होत्या.
www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.