www.starmazanews.com परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परांडा — शहर आणि तालुक्यातील तहानलेल्या नागरीकांना पिण्याचे थंडगार पाणी स्वतःच्या हाताने देऊन मागील चाळीस वर्षां पासून अविरत सेवा करणारे
*कै. पांडुरंग मामा कोळगे* यांच्या *स्मरणार्थ*
त्यांच्या चार मुलांनी सोनारी येथील काळभैरवनाथ यात्रे निमीत्त येणाऱ्या भाविक भक्तांसाठी मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले याचा शुभारंभ नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर , पोलीस निरीक्षक सुनील जी गिड्डे साहेब , राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले..
करमाळा– सोनारी रोड वरील छत्रपती संभाजी राजे चौक येथे हा उपक्रम राबविण्यात आला…
कसलीही अपेक्षा न करता तहानलेल्या. माणसाची तहान भागवण्यासाठी
वडिल कै. पांडुरंग मामा कोळगे यांचा वारसा
गोल्डन चौक येथे कायमस्वरूपी त्यांची *अरुण, मनोज, संजय आणि राजु* या चार मुलांनी पुढे चालु ठेवला आहे…
मागिल दोन वर्षापासून कोरोना संसर्ग मुळे यात्रा तसेच सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम घेता आले नाहीत.. उन्हाची तीव्रता वाढत असल्या कारणाने वाटसरू तसेच यात्रे करुना पाणी पाणी होत आहे हि बाब लक्षात घेऊन कोळगे परिवाराने *स्वखर्चाने मोफत गुळ आणि थंडगार पिण्याचे पाणी*
उपलब्ध करून दिले आहे…
यावेळी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर, पोलिस निरीक्षक सुनील जी गीद्दे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे,
मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष मा. गोरख मोरजकर सर , संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष समाधान खुळे, घनश्याम शिंदे, राजकुमार देशमुख, अनंत सुर्यवंशी सर, पो. कॉ. यादव, दिनेश तिवारी, अविनाश कदम , किरण डाके, तुकाराम पाटील, अहमद शेख, उपस्थित होते….
भाविकांना दिवस भर पाण्याची सेवा चारही मुलांसमवेत सुलतान शेख, बाळु गोडगे, गणेश गायकवाड, महादेव गायकवाड , गणेश रणशिंगे , सन्नी संजय काशीद , नवाबोद्दीन मुजावर, अभिजित कोळगे, अजिंक्य पाटील, ओम कोळगे , आदींनी केली…
www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.