www.starmazanews.com परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा ,ता.२५(प्रतिनिधी )राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले कंडारी ता.परंडा येथील ,थोरले श्री काळभैरवनाथांचा याञात्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याञेनिमित्त रविवारी ता.२४ रोजी भव्य कुस्ती मैदान घेण्यात आले.या आखाड्यातील अंतीम एकावन हजार इनामाच्या कुस्तीत ,महाराष्ट्र चँपीयन हणमंत पुरी याने आकडी डावावर नंदकुमार काकडे(श्रीकृष्ण तालीम आखाडा सोलापूर) यास अवघ्या दोन मिनिटाला चितपट करुन,रोख बक्षिस पटकाविले.तर आदेश तिंबोळे व बाबा रानगे या मल्लांची कुस्ती अटीतटीच्या लढतीनंतर बरोबरीत सोडविण्यात आली.

सालाबादप्रमाणे श्री क्षेञ कंडारी येथील प्रसिध्द थोरले श्री काळभैरवनाथ यांचा रथोत्सव,पालखी मिरवणूक ,शनिवारी ता.२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला.गुलाल खोबरयाची मुक्त उधळन करीत,मानाच्या कावडी नाचविण्यासह विविध धार्मीक कार्यक्रम घेण्यात आले.शनिवारी राञी बारा वाजता काळभैरवनाथ-जोगेश्वरी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.मंदिराचे मुख्य अरुण पुजारी, रमेश पुजारी यांनी विधीवत,धार्मिक कार्य केले.रविवारी ता.२४रोजी याञेनिमित्त,दुपारी चार ते राञी आठ वाजेपर्यंत भव्य कुस्ती आखाडा आयोजीत केला होता.या कुस्ती आखाड्याचे पुजन मान्यवंराच्या हस्ते कराण्यात आले.यावेळी ,भैरवनाथ ट्रस्ट अध्यक्ष डब्बल उपमहाराष्ट्र केसरी विजेते बाळासाहेब पडघन,जिल्हा तालीम संघाचे सदस्य नवनाथ जगताप,आप्पासाहेब खेड,योगेश पवार,सलीम शेख,कृष्णा राठोड,प्रकाश मांडवे,राहुल सोनवणे (सातारा) यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कुस्ती आखाड्यात,कोल्हापूर ,सातारा,सांगली,सोलापूर ,पुणे,उस्मानाबाद,अहमदनगर,आदि जिल्हाभरातुन आलेल्या मल्लांनी डाव-प्रतिडावाचे मल्लयुध्द खेळुन मैदानात चांगलाच रंग भरला होता.चटकदार,चितपटीने निकाली कुस्ती विजेत्या मल्लास प्रेक्षकांनी उस्फुर्त बक्षिसे वाटली.हलगीच्या कडकडाटाने मैदानात जोश निर्माण केला होता.या कुस्ती आखाड्यात लहान-मोठ्या १५० कुस्त्यां घेण्यात आल्या.या मैदानात,शिवयोग पडघण,मेघराज देशमुख,आदित्य कांबळे,सुजीत भगत,संग्राम घोगरे, किसन घोगरे,लक्ष्मण जाधव,मेघराज देवकर,पृथ्वीराज पडघण,आनंद घोडके,करण जाधव,संतोष तिबोंळे,हर्षवर्धन लोमटे,विजय काशीद,संकेत महानवर,श्रीराम करकुटे,दिपक पाटील,शहाजी फले,विशाल घोगरे यांनी प्रेक्षणीय विजय मिळविले.या आखाड्यात महिला कुस्तीगीर अहिल्या लवटे(अकलुज)निकिता चव्हाण(पुणे)सुप्रिया शिंदे(दांडेगाव)तेजस्वीनी शिंदे,दिपाली परदेशी(परंडा )यांनी प्रेक्षणीय कुस्त्या केल्या.पंच म्हणुन,उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघण,आदेश तिंबोळे,हरी घोगरे, विशाल देवकर, दिलीप मोरजकर,शिवाजी घाडगे,राम पाटील,उध्दव शिंदे ,वामन काशीद,नाना पवार,माऊली गोडगेआदिंनी काम पाहिले.तर याञाउत्सव,कुस्ती आखाड्यासाठी,सलामत शेख,बाळासाहेब पडघण,नवनाथ तिबोंळे,मुख्याध्यापक सुनिल पडघण,राहुल डोके,लक्ष्मण तिंबोळे,वामन काशीद,आण्णासाहेब महानवर,सचिन करपुटे,आदिसह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.
www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898


Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.