पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी कादर शेख यांची नियुक्ती.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समितीची सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महिला विभाग जिल्हा अध्यक्षा सुवर्णा सुना होत्या
बैठकीत प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार सन्मान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती राज्यातील पत्रकारांची नोंदणी पत्रकारावर दाखल केलेल्या गुन्ह्याची स्वतंत्र चौकशी पत्रकारांवरील होणारे हल्ले धमकी मारहाण कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांना शासकीय मदत राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता इत्यादी विषयावर चर्चा होऊन पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी सोलापूर नामा 24 न्यूज़ चैनल चे उपसंपादक कादर शेख यांची एकमताने निवड करण्यात आली पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा संघटक दत्तात्रय पवार यांच्या हस्ते कादर शेख यांचा ओळख पत्र नियुक्ती पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.


पत्रकारांवरील होणारे हल्ले चिंतनीय बाब असून वाळू माफिया गुटखा माफिया भूमाफिया बातमी लावण्यावरून पत्रकारांवर हल्ले करत असून बातमी लावण्यावरून जर जीवघेणे हल्ले होत असतील तर पत्रकारिता करायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला असून यापुढे पत्रकारांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नाही अशा माफियांना जशास तसे उत्तर देऊ असे पत्रकार सुरक्षा समितीचे नुतन जिल्हा संपर्क प्रमुख कादर शेख यांनी या बैठकीत ठणकावून सांगून पत्रकारांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे आवर्जून सांगत पत्रकारांच्या प्रश्नावर तडजोड करणार नाही असे यावेळी बोलताना म्हणाले
या बैठकीला प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे उपाध्यक्ष बळीराम पवार सोलापूर जिल्हा अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सादिक शेख शहर अध्यक्ष राम हुंडारे उपाध्यक्ष श्रीनिवास वंगा डॉ राजेंद्र शहा शहर प्रसिद्धी प्रमुख अक्षय बबलाद प्रसाद ठक्का अशोक ढोणे मोहम्मद इंडिकर इम्तियाज अक्कलकोटकर रोहित घोडके विष्णू सकट विशाल मोरे सत्तार डोंगरी भागप्पा प्रसन्न युनूस अत्तार इत्यादी पत्रकार उपस्थित होते

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!