www.starmazanews.com परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
उस्मानाबाद तालुक्यातील आष्टा ता भुम येथील श्री रणजीत दिलीपराव जाधव यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता वर्ग-२ पदी नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबवण्यात आलेल्या जलसंपदा विभागातील अभियंता वर्ग-२ पदासाठी २०१९ साली मुख्य परीक्षा घेण्यात आली होती सदर परीक्षेचा निकाल आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आला आहे. श्री रंजीत दिलीपराव जाधव हे सध्या मध्य रेल्वेमध्ये ज्युनिअर इंजिनीअर या पदावर कार्यरत आहेत त्यांचे वडील कै. दिलीपराव त्रिंबकराव जाधव हे बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालयांमध्ये प्राणीशास्त्र विभागात प्राध्यापक होते. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांची आई श्रीमती दीपा दिलीपराव जाधव यांनी त्यांच्या मुलास अशा कठिण परिस्थितीमध्ये देखील खंबीरपणे साथ दिल्याने त्यांना आज हे यश मिळाल्याचे श्री जाधव यांनी सांगितले त्यांनी शालेय शिक्षण बार्शी येथील सुलाखे हायस्कूल तसेच स्थापत्य अभियांत्रिकी चे शिक्षण तुळजापूर येथील कॉलेजमधून पूर्ण केले आहे तसेच त्यांच्या यशामध्ये त्यांची बहीण दीप्ती जाधव राज्य कर अधिकारी सोलापूर आणि प्रा. डॉ. स्वाती जाधव व तसेच सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.