पालकाच्या अपेक्षा व विद्यार्थ्यांची मानसिकता…
भाग :-८

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने

फार पूर्वी काळापासून शिक्षण तज्ञ सांगत आले आहेत की मुलांवर कोणतंही दडपण न टाकता त्यांना हसत खेळत शिक्षण घेऊ द्या, तसेच मुलांच्या मानसिकतेचा विचार करून त्याचा कल कोठे आहे त्या दिशेने त्याला शिक्षण द्या, मला वाटते त्यासाठी मागील काळात शासनाने मुलांसाठी कलचाचणीही ठेवली होती परंतु त्याकडेही बरेच पालक दुर्लक्ष करताना दिसत आहेत. माझी पालकांना नम्र विनंती आहे की आपल्या मुलामुलींना त्यांचा कल पाहुनच प्रवेश घ्यावा नाहीतर बऱ्याच वेळा मुलं पालकांच्या हट्टापाई त्यांना नको असलेल्या क्षेत्रात प्रवेश घेतात आणि मग पुढे अपेक्षीत यश मिळत नाही, त्यामुळे बरीच मुले निराश होताना दिसतात.
योग्य क्षेत्र निवडण्यासाठी पालकांनी प्रत्येक शैक्षाणिक क्षेत्राची मुलांना माहिती करून देणे आवश्यक आहे. मेडीकल म्हणजेच सर्वस्व नाही किंवा इंजनिअरींग म्हणजेच सर्वस्व नाही यापेक्षाही जास्त स्टेटस आणि पगार मिळवून देणारे क्षेत्र आहेत. हुशार मुलं ज्या क्षेत्रात जातील तेथे ती चमकल्याशिवाय रहाणार नाहीत, म्हणून मुलांच्या आवडीनुसार युपीएससी, एमपीएससी, प्रोफेसर, ॲग्री किंवा एखादा उद्योग व्यवसाय मुलांना करू द्या. त्यासाठी मुलांना नेहमी सकारात्मक बोला, मुलांसोबत नेहमी सकारात्मक चर्चा करा. बऱ्याच वेळा काय होत की मुले पालकांच्या अपेक्षेप्रमाणे प्रवेश घेतात व पुढे दोन तीन वर्ष प्रयत्न करून यश नाही मिळाले की नाराज होतात, आणि परत दुसरे क्षेत्रात प्रयत्न करायाचा म्हटले की उशीर झालेला असतो काही मुल यातून सावरतात परंतु काही मुलांना यामधून सावरणे जड जाते मग नको असलेले मार्ग निवडतात.
मी सर्वांना सांगू इच्छितो की समाजामध्ये वावरताना पैसा हे सर्वस्व नाही, पैशानी सर्वच कामे होतात असे नाही, हे पालकांनी समजावून घेणे आवश्यक आहे. आजची परस्थिती पहाता ज्यांच्याकडे पैसा जास्त आहे त्यांना शांत झोप लागत नाही आणि ज्यांना जेमतेम पैसा मिळतो त्या लोकांना शांत झोप लागते.
पैसा तर जीवनात आवश्यक आहेच परंतु पैश्यासोबत माणसाकडे माणुसकी असायला हवी, माणुसकी असल्याशिवाय माणसे जोडली जात नाहीत आणि माणसे जोडल्याशिवाय तुमची एक वेगळी इमेज तयार होत नाही.
म्हणून माझी आजच्या तरुण मुलामुलींना विनंती आहे की पैशावाला तर कोणीही होऊ शकतो परंतु आदर्श व्यक्ती म्हणून ओळख निर्माण करणे पैसे कमविण्याइतके सोप नाही. त्यामुळे प्रत्येक पालकांनी माझा मुलगा आदर्श व्यक्ती कसा बनेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

*संकलन*……✍️????

*शिवश्री गोरख मोरजकर*
*तालुका अध्यक्ष*
*मराठा सेवा संघ, परंडा*
*संस्थापक/अध्यक्ष*
*श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, परंडा*

www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!