प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत
प्रलंबित डाटा दुरुस्तीकरिता ग्रामपातळीवर कॅम्पचे आयोजन.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com प्रतिनिधी विजय शिंगाडे


उस्मानाबाद.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्हयातील प्रलंबित डाटा दुरुस्तीकरिता गावपातळीवर चौथ्या शुक्रवारी म्हणजेच 25 मार्च, 2022 पासून दुरुस्ती पूर्ण होईपर्यत उस्मानाबाद जिल्हयातील सर्व तालुक्यातील ग्रामपातळीवर कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या कॅम्प मध्ये ज्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळत नसेल अशा लाभार्थ्यांनी आपले बँक पासबुक, आधार कार्ड, 7/12, 8-अ उतारा इ. कागदपत्रे घेऊन शुक्रवारी 25 मार्च रोजी आपल्या गावात आयोजित करण्यात आलेल्या डाटा दुरुस्ती कॅम्प मध्ये उपस्थित राहून उपरोक्त कागदपत्रासह कॅम्प प्रमुखाला भेटावे. असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले आहे.

www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!