www.starmazanews.com परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
प्रतिनिधी
परांडा दि.9 मार्च 2022. वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दळवी उपप्राचार्य डॉ मोरे व आयक्यूएसी चे चेअरमन डॉ देशमुख अलका यांच्यासह संपूर्ण महाविद्यालयाची टीम परांडा येथे शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात येऊन या महाविद्यालयाने पुनर्मूल्यांकन करून महाविद्यालयास नॅक चा अ दर्जा प्राप्त केला आहे.या महाविद्यालयाने गुणवत्तावाढीसाठी केलेले प्रयत्न तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व महाविद्यालयाच्या विकासासाठी विविधांगी केलेले अनमोल कार्य लक्षात घेता या महाविद्यालयास क पासून अ पर्यंतचा दर्जा प्राप्त झाला आहे आणि उस्मानाबाद जिल्ह्यात एक मात्र महाविद्यालय गुणवत्तापूर्वक व नॅक चा अ दर्जा प्राप्त म्हणून नॅक समितीने मान्यता दिली आहे .याचाच भाग म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या अनेक महाविद्यालयांनी व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या अनेक महाविद्यालयांनी या महाविद्यालयास भेट देऊन या महाविद्यालयाचे कामकाज या महाविद्यालयाची गुणवत्ता या महाविद्यालयाचे सर्व तयार केलेल्या फाइल्स अभ्यासल्या व या महाविद्यालयाचे मार्गदर्शन घेतले.यावेळी या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी प्राचार्य डॉ महेशकुमार माने यांनी आलेल्या सर्व टीमचे स्वागत केले .यावेळी त्यांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी आईक्यूएसी चेअरमन तथा प्रभारी प्राचार्य डॉ महेशकुमार माने यांनी सर्वप्रथम प्रास्ताविक स्वरूपामध्ये सर्व माहिती त्यांना दिली .यावेळी एक ते सात पर्यंतच्या असलेल्या क्रायटेरिया ची माहिती त्या त्या क्रायटेरिया च्या समन्वयकांनी समोर मांडली .यामध्ये क्रायटेरियाचे समन्वयक अनुक्रमे प्रा जगन्नाथ माळी ,डॉ विद्याधर नलवडे, डॉ महेशकुमार माने ,डॉ अक्षय घुमरे, प्रा संतोष काळे ,डॉ प्रशांत गायकवाड, डॉ राहुल देशमुख यांनी केलेल्या सर्व फाइल्सचे सादरीकरण केले . यावेळी घाटनांदुर या महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांनी आपल्या समस्या मांडल्या व त्याचे निरसन रीतसर करण्यात आले .सकाळी 11 ते दुपारी पाच वाजेपर्यंत या महाविद्यालयाच्या कामकाजाबद्दल व अनेक संदर्भात माहितीचे संकलन करण्यात आले.शेवटी डॉ शहाजी चंदनशिवे यांनी आभार मानले.
www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.