www.starmazanews.com परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परांडा येथील ग्रामीण रुग्णालयात जिल्हा शासकीय रुग्णालय, समाज कल्याण आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यांग तपासणी शिबिर 03/03/2022 घेण्यात आले या शिबिरात 250 अस्थिव्यंग 40 मतिमंद आणि 200 नेत्र रुग्णांची तपासणी वैद्यकीय अधीक्षक अब्रार पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी आर्थोपेडिक तज्ञ डॉ.बाराते, डॉ.बर्वे डॉ. शेटे,डॉ पल्ला, डॉ.नरवडे ऑपरेटर अमोल भांबुरकर व सहकारी तसेच समाज कल्याण निरीक्षक सुभाष शिंदे गटविकास विस्ताराधिकारी अगतराव कावळे ,गटशिक्षणाधिकारी परांडा अशोक खुळे पंचायत विस्ताराधिकारी वगे महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष प्रदीप डोके सचिव रियाज पठाण महिला अध्यक्ष मंगल शिंदे, जिल्हाध्यक्ष अमोल शेळके परंडा तालुकाध्यक्ष तानाजी घोडके समाज कल्याण विभाग महादेव कोल्हार परंडा तालुका सचिव पांडुरंग मिसाळ सलामत शेख, शिरसागर तात्या लघू उद्योग सल्लागार गणेश नेटके महेश ठोगे, तसेच परंडातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हे शिबिर पार पाडण्यासाठी सर्व ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेविका, ग्रामसेवक व आशा सेविका स्वयंसेवी कार्यकर्त्या यांनी सर्वांनी मोलाचे योगदान दिले या कार्यक्रमासाठी परंडा तालुक्यातील परंडा तालुकाध्यक्ष तानाजी घोडके यांनी पाठपुरावा करून हे शिबिर आयोजित केले होते परंडा येथील ग्रामीण रुग्णालयात अशाप्रकारे दिव्यांग तपासणी शिबिर पार पडले. हे शिबिर पार पाडण्यासाठी ग्रामीण रुग्णालय परांडा परंडा पोलीस स्टेशन पंचायत समिती परांडा गटशिक्षण अधिकारी परांडा दिव्यांग संघटना परांडा यांनी मोलाचे सहकार्य केले
www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898
![starmazanews](https://secure.gravatar.com/avatar/4fda7f8e27869db8a392615e0d2c6001?s=96&r=g&d=https://starmazanews.com/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.